पॉईंट एखादा माणूस जे लिहितो आहे ते त्याचं #observation असू शकतं. त्यानुसार तो ते त्या भावनात्मक शब्दात मांडतो. तो त्याचा व्यक्तिगत अनुभव किंवा स्वभाव नसतो. तसे नसते तर एकाच वेळी प्रेमळ #शायरी आणि #दर्द भऱ्या गजला लिहिणाऱ्या माणसाला काय म्हणणार तुम्ही? आपण? शृंगारिक लिहिणारी व्यक्ति प्रत्यक्षात तशीच असेल का? नर्म विनोदी लिखाण करणाऱ्याला परिस्थितीचे गांभिर्य कधीच कळत नसेल? विनोदा मधून (तून) गंभिर विषयाची परीक्षा करण्याची विशेष दृष्टी त्याला प्राप्त झालेली असते. नात्यांवर,त्यांच्या जिव्हाळ्या वर बोलणाऱ्या माणसाला, त्याच्याच जवळच्या जिवाभावाच्या माणसांकडून धोका दिला गेला नसेल कशावरून? अपेक्षाभंग झालेला माणूस त्यातून बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वास (सा) वर, खंबिर पणावर, आयुष्याच्या #
पॉ झि टी वि टी वर लिहायचा , बोलायचा प्रयत्न करत असतो. स्वतःचा अनुभव किंवा अगदी जवळून आलेला अनुभव किंवा एखाद्या गोष्टीचं परिक्षण केल्यानंतर कोणत्या रुपात, कोणत्या माध्यमातून व्यक्त व्हायचं हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे; किंवा असं म्हणुया की ठराविक व्यक्तिला आलेला जगण्यातला अनुभव, विशिष्ट भावनांना, स्वभावा विरूद्ध शब्दात मांडण्याची देणगी मिळालेली असते. त्यामुळे अनेक विषयांवर सहज लिहिणाऱ्या माणसाला कोणत्या चौकटीत बसवणार आपण? आयुष्याला, त्या पेक्षा रोजच्या जगण्याला कोणत्या दृष्टीतून पहातो तशी त्याला अनुसरून प्रत्येक व्यक्तीनुसार त्याची स्वतःची अशी व्यक्त होण्याची भाषा असू शकते मग ते शब्दं त्याचे ठराविक साच्याचे असोत की नसोत. त्यामागच्या भावना व्यक्त करण्या इतके शब्द पुरतात आणि जन्माला येते नवे रुप,रंग आणि रस असलेले भावनेचे नवे गाणे. ज्याने लिहिलं आहे त्याच्या पुरत ते जगणं आहे, एक विश्व जे त्याच्या अनुभवा च्या लेखणी मधून आले आहे. आपण कशी लावणार चौकट!!??!!. रितिका ©® आवडल्यास लेखकाच्या नावाने शेअर करायला हरकत नाही. नाव वगळु वा बदलू नये. वाचकांना संपर्क करता येईल.
Comments