top of page

निमित्त!!

निमित्त.


सगळं कसं निमित्त मात्र!


स्वतःचं असणं, इतरांशी जोडलं जाणं, जोडलेलं रहाणं हे आपल्या असण्यामुळे असतं असं वाटलं तरी आपल्या शिवाय जगाचं चालतच असतं. रोज नव्या संकल्पना जन्म घेतात आणि लयाला जातात. आपण मात्र निमित्त होतो कुणा मागच्या हसण्याचे, कुणामागच्या दुःखाचे, उगवणाऱ्या अंकुरापासून ते विझणाऱ्या दिव्यापर्यंतचे! पूर्णत्व मात्र नाही. सगळा नुसता आभास! जोडलेले आहोत, सहवासात आहोत, कनेक्टेड आहोत इतकं वाटण्या पुरता. पण आपल्या शिवाय जग चालते हे थोडं कोपऱ्यावर, कडेवर, बाजूला उभराहून पाहिले की कळते. आपण स्वतः मात्र निमित्त मात्र असतो. डावीकडे उजवीकडे ज्या साखळी ला जोडले गेलो आहोत त्यामुळे असं वाटत राहतं की मी कुणी आहे कुणाचा, माझं कुणीतरी आहे; पण साखळीत जोडली गेलेली प्रत्येक कडी हाच विचार करत असते.


एक दिवस पकडुन राहाण्यातला जोर संपला, तो रोल, ती भूमिका संपली की आपण निखळतो आणि आपल्या शिवाय पुन्हा उजवी आणि डावी बाजू जोडली जाते. तुटलेल्या साखळीची पुन्हा एक अखंड साखळी तयार होत जाते.


आपण मात्र फक्त निमित्त!


रितिका ©® ऋचा चैतन्य. #9049680353 आवडल्यास लेखकाच्या नावाने शेअर करायला हरकत नाही. नाव वगळु वा बदलू नये. वाचकांना संपर्क करता येईल.


Recent Posts

See All
bottom of page