मेष
ह्या आठवड्यात सरळपणे मिळणारे यश, मनःशांती आणि नवेपणा दिसतो आहे. तुमच्यासमोर जे काम येईल ते करत रहा त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखे वागण्यासाठी काही वेळ मिळेल. कामात यश मिळेल. तुमच्या काही इच्छा नक्कीच पूर्ण होतील. ज्योतिष आणि भक्ती तसेच इतर अध्यात्मिक साधनेचा उपयोग करून घेतल्यास अजून फायदा होईल. प्रेमात दुःखाकडे, वाईट अठवणींकडे लक्ष देण्यापेक्षा चांगल्या आठवणींचा विचार करा. कम्फर्ट मध्ये भर पडेल. सुखसुविधा मध्ये मन गुंतल्यामुळे काहीच करायची इच्छा नसेल. प्रवास करण्याने लाभ होईल. लघवी ला जळजळ होणे तसेच मुतखड्याचा त्रास होऊ शकतात. भरपूर पाणि प्या आणि काळजी घ्या.
शुभ रंग - Beige
शुभ स्टोन - सुजी लाईट.
@Ritikaslifetherapies
वृषभ
ह्या आठवड्यात स्वतःची शक्तीस्थाने ओळखा.स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. राग व्यक्त करताना सुद्धा स्वतःवर संयम ठेवायचा सराव करण्याची गरज आहे. तुम्ही जर एखादा प्राणी पाळला असेल तर त्याची काळजी घ्या. त्या प्राण्यामुळे तुम्हाला काही इजा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. फिजिकल एक्सरसाइज ची अत्यंत गरज आहे. त्याच सोबत एखादा दिवस उपवास केल्याने पर्सनल पावर वाढण्यास मदत होईल ज्याची तुम्हाला फार गरज पडणार आहे. प्रेमात इतके बुडाल की दुसरे काही सुचणार नाही.
शुभ रंग - मिंट ग्रीन
शुभ स्टोन - गारनेट.
@Ritikaslifetherapies
मिथुन
सर्वात प्रथम शरीराकडे लक्ष द्या. पैशापेक्षाही जास्त ताकद प्रार्थनेमध्ये भक्तीमध्ये आणि भावनांमध्ये असते याची जाणीव येत्या दिवसांमध्ये तुम्हाला होईल. कामांमध्ये यश मिळेल. पार्टनरशिप होतील ज्यातून फायदा होईल. फॅमिली आणि फ्रेंड्स यांच्याशी भेटीगाठीचे योग आहेत. एखाद्या समस्येचे समाधान तुम्हाला अनुभवी किंवा घरातील वडील व्यक्तींकडून मिळू शकते मात्र त्यासाठी त्यांचे ऐकण्याची तयारी ठेवावी लागेल. प्रेमामध्ये फसवणूक होऊ शकते. एखादे प्रकरण चालू असेल तर कोर्टाचा निकाल तुमच्या विरुद्ध लागू शकतो किंवा त्या बाबतीत निर्णय लांबतील. कॉन्स्टिपेशन तसेच वजन वाढल्याने त्रास होऊ शकतो.
शुभ रंग - नारंगी
शुभ स्टोन - ब्लड स्टोन.
@Ritikaslifetherapies
कर्क
स्वतःच्या रुटीन कडे लक्ष देण्याची गरज आहे. पुढे काय होणार याची काळजी करण्यापेक्षा तुमच्या कामाचे नियोजन नीट करा. बॉसगिरी करणे,चिडचिड करणे याचा तुम्हाला त्रास होईल. वडिलांच्या तसेच वडीलधाऱ्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. त्यांना वेळ द्यावा लागेल अन्यथा काळजी करण्यासारखे काही तरी घडू शकते. नको त्या गोष्टी स्वतःवर लादून घेण्यापेक्षा वेळेवर "नाही" म्हणणे योग्य राहील अन्यथा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. तुमच्यावर आलेली जबाबदारी तुम्ही इतरांवर ढकळण्याचा प्रयत्न कराल. अति उत्साह मुळे कामे वाढवून ठेवणार आहात.प्रेमाच्या बाबतीत पार्टनर ला म्हणावा तितका वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे नाराजी राहील. अपचनाचा त्रास होऊ शकतो.
शुभ रंग - ब्राऊन
शुभ स्टोन - कारनेलियन.
@Ritikaslifetherapies
सिंह
प्रवास करण्यासाठी तयार राहा. प्लॅनिंग करण्यासाठी वेळ मिळणार नाही इतक्या झटपट चांगल्या किंवा वाईट घटना घडतील. जमेल तेव्हा लिस्टनुसार प्लानिंग करा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या बातम्या कळतील. अनपेक्षित पणे काही गोष्टी घडतील ज्या तुम्हाला फायदा देतील. बऱ्याच दिवसापासून एखाद्या बातमीची वाट पाहत असाल तर ती मिळेल. प्रेमात पाय मात्र जमिनीवरून हलणार नाहीत याची काळजी घ्या. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात इतके बुडून जाल की आजूबाजूचे भान राहणार नाही. त्याचबरोबर जर गैरसमजुतीमुळे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले असतील तर त्यात पॅच अप होईल.पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व काही सुरळीत होईल. ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.
शुभ रंग - ऑलिव्ह
शुभ स्टोन - Aventurine
कन्या
तुमचे विरोधक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा शांत रहा. खूप फास्ट जाण्यापेक्षा स्वतःला स्लो डाऊन करा. सत्य काय आहे ते न समजल्यामुळे निर्णय घेता येणार नाही. तुम्हाला जी माहिती मिळेल किंवा जी माहिती पुरवली जाईल ती अपूर्ण असेल किंवा मग जाणीवपूर्वक ती माहिती तुकड्या तुकड्यांमध्ये तुमच्यासमोर मांडली जाईल. या सगळ्या परिस्थितीमध्ये मनाचा गोंधळ उडेल त्यामुळे निर्णय घेता येणार नाही.भांडणातून माघार घेणे हे उत्तम राहील. तुमच्या जवळच्या व्यक्तींशी बोलल्यामुळे मनावरचे ओझे हलके होईल. लाईफ पार्टनर सोबत बोलून बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळतील. त्यामुळे तुम्ही निराशेतून बाहेर पडाल.
शुभ रंग - lilac
शुभ स्टोन - सिट्रिन
@Ritikaslifetherapies
तुळ
नविन संधी मिळतील. नव्या कामाची सुरुवात होईल. तुमच्याकडे भरपूर कल्पना आणि एनर्जी असणार आहे त्याचा उपयोग करून घ्या.कामात नाविन्य आणायचा प्रयत्न करा. प्रेग्नेंसी,बाळाचा जन्म, नविन घर, नविन दुकान इत्यादी बातम्या कळतील. तुमचा प्रोजेक्ट किंवा ऑफर एक्सेप्ट केले जाईल. प्रेमात असाल तर फिरायला जाणे, एकत्र काम करणे, एकमेकांसाठी गिफ्ट घेणे असा छान वेळ जाईल. नोकरीमध्ये तुमच्या प्रेझेंटेशन मुळे प्रभाव पडेल. प्रोग्रेशन मिळण्याचे योग आहेत.
शुभ रंग - पांढरा
शुभ स्टोन - Amethyst
@Ritikaslifetherapies
वृश्चिक
महिन्याचा शेवट आणि नविन महिन्याची सुरुवात हे हसत खेळत करा. नेहमी तुमची नकारात्मक बाजू जगाला दिसते त्यामुळे तुमची चांगली बाजू ही दाखवा.तर ह्या आठवड्यात थोडी गंमत करा आणि लहान मुलांसारखे निरागस राहा परंतु वागण्यात मोठेपणा ठेवा. एखाद्या घटने संबंधी किंवा व्यक्ती सोबत आठवणी वाईट आहेत म्हणून त्यांना टाळणे ठीक आहे परंतु त्यासोबत काही चांगल्या आठवणी सुद्धा असतात त्यांचा विचार करा. एखाद्या व्यक्तीला तुम्ही जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू शकता. असे करताना त्या व्यक्तीच्या चांगल्या वागण्याचा- बोलण्याचा, पूर्वीच्या चांगल्या नातेसंबंधाचा विचार जरूर करा. घरासंबंधी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी पार्टनर सोबत प्रवास करावा लागेल. कामात यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग - Mauve Rose (मौवे रोझ)
शुभ स्टोन - हाऊलाइट
@Ritikaslifetherapies
धनु
या आठवड्यात मल्टी टास्किंग बनावे लागेल. एखाद्या जगलर प्रमाणे कुशलतेने काम बॅलन्स करावे लागेल. अचानक एकामागून एक रेंगाळलेली पैशांची कामे मागे लागतील. एखाद्या भावनिक गोष्टीपासून वाचण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतःला कामात गुंतवून घेण्याचा प्रयत्न करू शकता. एखाद्या कामातून लाभ मिळवण्यासाठी पैशाच्या मागे धावणे, प्रवास करणे आणि गरज पडल्यास त्याकरता घर बदलणे इत्यादी करणे तुमच्यासाठी फायद्याचे असेल. प्रेमात मात्र हात आखडता घेऊ नका. तुमच्या स्वार्थासाठी पार्टनर सोबत वाईट वागू नका.त्यांना वेळ द्या. त्यांना काय हवे नको ते पहा तर आठवडा चांगला जाईल. पार्टनर साथ देईल परंतु तुम्ही स्वतःच्या क्षूल्लक स्वार्थासाठी त्याचा वापर करायचा प्रयत्न करू शकता.
शुभ रंग - बरगंडी
शुभ स्टोन - Black Serpentine
@Ritikaslifetherapies
मकर
मागच्या चुका आणि अपयश विसरून पुढे जा. तुम्ही जो काही विचारपूर्वक निर्णय घेत आहात त्यावर ठाम राहा यश मिळेल. एखादा प्रकल्प, नवे काम सुरू होण्याची वाट पाहत असाल तर ते आता होईल. त्यासाठी संबंधित व्यक्तींना भेटणे, त्यांच्यासोबत मिळून कामाच्या अटी शर्ती ठरवणे अशा महत्त्वपूर्ण गोष्टी घडतील. करार होतील. कामाच्या संदर्भात प्रवास होतील. फॉरेन किंवा इतर ठिकाणी फिरायला जाण्याचे योग आहेत. एवढे सगळे चांगले करून मात्र नको ते बोलून स्वतःचे नुकसान करून घेणार आहात. तेवढे करण्याचे थांबवा. लाईफ पार्टनरला बोलुन दुखवू नका. घरी न विचारता मोठे निर्णय घेऊ नका. तुमचे नुकसान होईल आणि नातेसंबंध दुरावतील.
शुभ रंग - पिस्ता ग्रीन
शुभ स्टोन - सोडालाइट.
@Ritikaslifetherapies
कुंभ
स्वतःचे आत्मनिरीक्षण करा. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कुठेही ऑनलाइन किंवा पुस्तकात मिळणार नाहीत तर ती तुमच्याच मनात तुम्हाला सापडतील. त्यामुळे थोडा वेळ स्वतःला द्या. एकट्याने काही काळ घालवा. आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांच्या आधारे तुम्ही पुढचा मार्ग यशस्वीपणे पार करू शकाल परंतु त्यासाठी मन स्थिर असणे गरजेचे आहे. नातेसंबंधांमध्ये एखादी गोष्ट खटकत असेल तर ती बोलून दाखवा. एखादी वाईट सवय सोडायची आहे परंतु जमत नाही अशा वेळेस घरच्या अथवा जवळच्या व्यक्तींची मदत घ्या म्हणजे त्यातून लवकरात लवकर बाहेर पडता येईल. पार्टनरला दोष देण्यापेक्षा तुमच्या वागण्यात बदल करा.
शुभ रंग - टील
शुभ स्टोन - Turquoise
@Ritikaslifetherapies
मीन
ह्या आठवड्यात तुम्ही ऑर्गनाईज, प्रॅक्टिकल वागून यश संपादन करू शकता. त्याचप्रमाणे पर्यावरणाची काळजी घेणारी, उत्तम संघटन कौशल्य आणि व्यावहारिक असलेल्या व्यक्तीशी भेटीगाठी होण्याचे संयोग आहेत. त्यातून प्रेरित होऊन तुम्ही स्वतःमध्ये तसे बदल करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या अवतीभवतीच्या सर्वांची अगदी आपुलकीने काळजी तुम्ही घेताना दिसाल. मल्टीग्रेन खाद्यपदार्थांचा समावेश तुमच्या जेवणात केल्यास आठवडाभर एनर्जी टिकून राहील. त्याचबरोबर पैशाच्या गुंतवणुकीविषयी विचार सतत मनात घोळत राहतील. पार्टनर सोबत वेळ घालवा. कसलेही प्लॅनिंग करू नका. बऱ्याच दिवसांनी कसले तरी ओझे उतरल्यासारखे वाटेल, त्यामुळे फक्त एकमेकांना वेळ द्या.
शुभ रंग - Fuchsia फुचशिया
शुभ स्टोन - Pink Tourmaline
@Ritikaslifetherapies
Comments